जातिवंत दुधाळ गाई

दुध धंदा करायचं पण जातीवंती दुधाळ गाई मिळत नाहीत. बाजारात घेण्याचा प्रयत्न करून बघितला पण काही गाई खोट्या लागल्या.  क्रांती ज्योती डेअरी फार्मवर चार वर्षापासून जातीवंती होस्टन गाईचं ब्रीडिंग केले जाते . गाई खरेदी करण्यासाठी संपर्क करा.

email krantijyotidairyfarm1@gmail.com

फोन- 02421-232348.

Learn More

शेणखत

रासायनिक खत वापरून शेतजमीनी खराब होत आहेत आणि रासायनिक खतांचा किमतीही परवडत नाहीत. चला शेणखत वापरून जमीन कसदार बनऊ आणि भरगोस उत्पन्न मिळऊ. क्रांती ज्योती डेअरी फार्मवर शेणखत विक्री साठी उपलब्ध आहे. खरेदी करण्यासाठी संपर्क करा.

Learn More

शुद्ध गाईचे दुध

बाजारातील  भेसळयुक्त दुध पिल्याने तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. क्रांती ज्योती डेअरी फार्मवरील दुध हे सूक्ष्मजीव विरहित आहे कारण की हे दुध मशीन ने काढले जाते. दुध आणि दुधाचे पदार्थ खरेदी करण्यासाठी संपर्क करा.

Learn More

क्रांती ज्योती डेअरी फार्म

कुठल्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी, अपयशाने खचून न जाता चुका दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात. प्रत्येक धंद्यात मार्गदर्शनाची गरज असते. काहींचा अनुभव हाच मार्गदर्शक असतो. धंद्यात त्याच त्याच चुका करणारे कधीच यशस्वी होत नाहीत.  दुध धंद्यात उत्तम नियोजन, व्यवस्थापन, दूरदृष्टी आणि गाईंचे संगोपन करता येणे खूप गरजेचे आहे. व्यवस्थापकाने जातिवंत दुधाळ गाईंची निवड करणे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कारण दुधातूनच उत्पन्न मिळते.  क्रांती ज्योती डेअरी फार्मवर चार वर्षांपासून जातिवंत दुधाळ गाईंचे संगोपन आणि ब्रीडिंग केले जाते. प्रत्येक वेताला जन्माला येणारे वासरू त्याच्या आईपेक्षा जास्त उत्पादन क्षमतेचे तयार होते. क्रांती ज्योती डेअरी फार्मवर 100 गाई आहेत. गोठा सुसज्य व मुक्तसंचार पद्धतीचा आहे. चारा टाकण्यासाठी मशीन वापरली जाते. गाईना सकस आहार मका, मुरघास आणि पशुखाद्य दिले जाते. संसर्गजन्य रोगांसाठी वेळेवर लसीकरण केले जाते. गाई पालन आणि दुग्ध व्यवसायातील कुठलीही अडचण असेल तर नक्की सांगा. तुम्हाला माहिती दिली जाईल.

kj1440 copy

मार्गदर्शनासाठी संपर्क करा

दुध धंद्यातील अडचणी, चारा व्यवस्थापन,गोठा व्यवस्थापन, गाईंचे संगोपन, मार्गदर्शनासाठी संपर्क करा.