जनावरांचे आजार आणि उपचार

जनावरांचे आजार आणि उपचार

जनावरांचे आजार आणि उपचार

 

पशुंचे आजार व उपचार जनावरांचे आजार आणि उपचार 

नमस्कार मित्रांनो क्रांती ज्योती डेअरी फार्मवर तुमचं स्वागत आहे. पशुपालन व्यवसायातील गाईंची निवड, चारा व्यवस्थापन, गोठा पद्धत, दुग्धव्यवसाय अडचणी, या विषयांबद्दल माहिती तुम्ही वाचली असेलच. दुग्ध व्यवसायात पूर्व नियोजन किती महत्वाचे आहे हे तुम्हाला समजेल असेलच. गाई पालन उद्योगातील पशुंचे आजार व उपचार हा मुद्दा देखील इतर मुद्यांप्रमाणे महत्वाचा आहे कारण माणसांप्रमाणेच गाईना देखील आजार होतात. वेळेवर उपचार केल्यानंतर बरे ही होतात. साथीचे रोग होतात. त्यांना लसीकरण करावे लागते. गाई पालन किंवा दुग्ध व्यवसायातील उद्योजकला गाईंचा आजारांची प्राथमिक माहिती असने खूप गरजेचे आहे. कारण आपण लगेचच डॉक्टरांना बोलावून उपचार करू शकतो आणि आपल्या गाईचे प्राण वाचऊ शकतो. उद्योजक जर अज्ञानी असेल तर उपचार करायला उशीर ही होऊ शकतो. प्रसंगी पशुचे प्राण ही दगाऊ शकतात म्हणून पशुंचे आजार व उपचार माहिती असणे खूप गरजेचे आहे.

गाई आजारी असल्याची लक्षणे

विविध रोगांचे, आजारांची वेगवेगळी लक्षणे आहेत. पण काही कॉमन लक्षणे आहेत जसे की आजारी जनावर कुचंबल्यासारख दिसते, खात नाही, पाणी पीत नाही, दुध कमी देणे, अंगावरील तकतकी कमी होणे, रवंथ न करणे, नाकपुडी कोरडी व पंढरी पडणे तसेच ताप हे देखील बऱ्याच आजारांचे कॉमन लक्षण आहे. उद्योजकला उत्तम संगोपन करता यावे. पशूचे निरीक्षण करावे. निरीक्षनातुंच कोणती गाई आजारी आहे, कोणती माजावर आहे, कोणती गाभण आहे. हे उद्योजकाला समजायला हवे. दिवसातील ठराविक वेळ त्याने गाईंचा निरीक्षणासाठी देणे खूप गरजेचे आहे.

निरोगी जनावरांची लक्षणे

शरीराचे तापमान 100 अंश ते 102 अंश फँ. 37.8 अंश ते 38.9 अंश सें.ग्रे.

नाडीचे ठोके

40 ते 50 एका मिनिटात.

श्वासोछ्वास

20 ते 25 एका मिनिटास

गाईनमध्ये आढळनारे रोग  जनावरांचे आजार आणि उपचार

  • फऱ्या black Quarter (संसर्गजन्य रोग)

हा रोग क्लाँस्ट्रीडीयम शोव्हीआय या जिवाणूमुळे होतो. अशुध्द चारा आणि पाणी यांचा माध्यमातून या रोगाचा प्रसार होतो. मुख्यता पावसाळ्यात होतो.

लक्षणे-

आजारी जनावराला एकाएकी ताप येतो. मागचा पाय लंगडतो.फऱ्यावर व पुठ्यावर सूज येते.

उपाय-

प्रतिजैविके, तसेच पावसाळयापूर्वी लसीकरण.

  • घटसर्प (संसर्गजन्य रोग)

लक्षणे-

अचानक आजारी पडते, खाणेपिणे बंद, अंगात ताप भारतो, गळयाभोवती व छातीभोवती सूज येते, घशात घरघर, श्वासोछ्वासाचा त्रास होऊन जनावर एक दोन दिवसात दगावते.

उपाय-

पावसाळ्यापूर्वी लासीकरण देणे. आजारी पडल्यानंतर डॉक्टरच्या सल्याने उपचार.

  • स्तनदाह (दगदिकास) Mastitis

लक्षणे-

कासेला, सडला सूज, दुधात गीठूळ्या, रक्त, पु येणे.

  • कालीपूळी (अँन्थ्राक्स) /फाशी /गोळी

हा रोग बँसिलास अँन्थ्रेसीस नावाचा जिवाणूमुळे होतो

लक्षणे-

कान, तोंड, योनीमार्ग व गुदुद्वारातून रक्तस्राव होतो. जनावर एकाएकी आजारी पडते, खाणे पिणे रवंत करणे बंद करते.

उपाय-

आजारी पडल्यानंतर डॉक्टरच्या सल्याने उपचार.

  • लाळ खुरकुत foot and mouth desease (संसर्गजन्य रोग)

हा साथीचा रोग हिवाळ्यात येतो.  दुषित पाण्याने हा रोग झपाट्याने होतो.

लक्षणे-

जनावरांचा तोंडात, जिभेवर, हिरड्यावर फोड येतात. आजारी गाईंचा तोंडातून सतत लाळ गळते. ताप येते. खाणे, पिणे, रवंथ करणे मंदावते. खुरांमध्ये जखमा होऊन जनावर लंगडते.

उपाय-

वेळेवर लसीकरण करावे.

आजारी जनावराच्या तोंडातील जखमेवर पोटँशियम परमँगनेट 1% द्रावणाने धुवून त्यावर बोरिक पावडरयुक्त ग्लिसरीन लावावे. आजारी जनावरांच्या पायाचा जखमा मोरचुदाच्या 1% द्रावनाने धुवून काढाव्यात. त्यावर जंतुनाशक मलम लावावा.

  • बुळकांड्या (Rinder pest) (संसर्गजन्य रोग)

बुळकांड्या हा रोग अत्यंत घातक आहे. हा रोग मुख्यतः पावसाळ्यात येतो. दुषित चारा पाणी यामुळे हा रोग लवकर पसरतो. या आजाराने जनावर दगावण्याची शक्यता जास्त असते.

लक्षणे-

सुरवातीला जनावराला ताप येतो. जनावर लाळ गाळते तसेच त्याचे डोळे खोल जातात. हिरड्यावर लाल रंगाचे बारीकसे व्रण दिसतात. सुरवातीला बध्दकोष्टता आणि नंतर जुलाब सुरु होतात. या आजाराने आठ ते दहा दिवसात जनावर मरते.

उपाय-

डॉक्टरांचा सल्ल्याने उपचार.

  • पोटफुगी

हा पचनसंस्थेचा आजार आहे. पोटात गँस तयार होऊन पोट फुटते. पावसाळ्यात हा रोग जास्त आढळतो. हिरवे गवत जास्त खाणे, खराब शिळे अन्न खाणे यामुळे पोटामधील जंतांचे प्रमाण वाढून गँस तयार होतो.

लक्षणे-

जनावराचे पोट फुगते त्याला उठता येत नाही आडवे पडते.

उपाय-

30 ग्रँम हिंगपूड व 60 मिली टर्पेटाइन तेल अर्धा लिटर गोडतेलाबरोबर पाजावे.

  • हागवण

अन्नाद्वारे आणि पाण्याद्वारे होणारा आजार.

लक्षणे-

पातळ शेन टाकते.

उपाय-

डॉक्टरांचा सल्ल्याने उपचार.

या आजारांबरोबारच सारा, तीवा, थायलेरीयासीस, जोन्स, हे आजारही जनावरांमध्ये आढळतात.

जनावरांचे आजार आणि उपचार ही माहिती कशी वाटली हे नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *