जातिवंत गाईचे चारा व्यवस्थापन कसे काराल ?

जातिवंत गाईचे चारा व्यवस्थापन कसे कारालजातिवंत गाईचे चारा व्यवस्थापन कसे काराल

जातिवंत गाईचे चारा व्यवस्थापन कसे काराल ?

गोठा व्यवस्थापनाबरोबरच चारा व्यवस्थापन हा गाई पालन व्यवसायामधील महत्वाचा मुद्दा आहे. कारण कितीही जातीवंती गाई विकत घेतल्या आणि त्यांना खायला हिरवा चारा नसेल. सकस आहार नसेल तर तुम्ही दुध धंद्यात नक्कीच यशस्वी होणार नाहीत. गाई त्यांच्या क्षमतेपेक्षा कमीच दुध देणार. गाईला दिवसाला सरासरी 25-30 किलो चारा खायला लागतो. यात प्रामुख्याने हिरवा चारा जास्त म्हणजे 70 ते 80% असावा त्यानंतर वाळलेला चारा 20 टक्के असावा आणि मुरघासाचे प्रमाण 5 ते 10% असावे.

चारा व्यवस्थापनातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हिरवा चारा वर्षभर उपलब्ध हवा.

हिरव्या चारयामध्ये मका चारा हा सर्वात महत्वाचा आहे. हिरवा मका चारा जर वर्षभर उपलब्ध असेल तर जातिवंत दुधाळ गाई 100 टक्के दुध देणार.  त्यानंतर ज्वारी,  ओट, मेथी घास, दशरात गवत हा चारा देखील गाईना चारला जातो.

वाळलेला चारा

कडधान्याचे भुसकट, ज्वारीचा कडबा, गहू, सोयबीन काड, वाळलेल्या चार्याने दुधातील फँट्सचे प्रमाण वाढते.

मुरघास

हा एका खड्यात किंवा मुरघास पिशवीत तयार केला जातो. मुरघास तयार करण्यासाठी हिरवी मका वापरली जाते. मुरघास हा आम्बलेला असतो यात मीठ गुळ असल्यामुळे गाई मुरघास चवीने खातात. मुरघासामुळे गाईंची तब्येत व्यवस्थित राहते.

मुरघास प्रक्रियेबद्दल अधिक वाचण्यासाठी क्लिक करा.

दुभत्या जनावरांचे पशुखाद्य, पशुखाद्य तयार करणे

आज बाजारातून पशुखाद्य विकत घेणे दुग्ध उद्योजकाला परवडत नाही. आज सरकी आणि भुसा गोणीची किंमत 1100 रु आहे. यापेक्षा घरगुती पशुखाद्य तयार केले तर ते उत्तम आणि खात्रीशीर होईल.

खुराकातील खाद्यान्न मिश्रणाचे प्रमाण

भुईमुगाची ढेप 25 %

गव्हाचा कोंडा 33 %

मका, ज्वारी, बाजरी भरडा 40%

मीठ 1%

गाईना प्रथिने, तंतुमय पदार्थ, क्षार, जीवनसत्वे यांची गरज असते.

सोडियम, पोटँशियम, कँल्शियाम, लोह, तांबे, कोबाल्ट ई व अनेक क्षार घटकांची गाईना नित्तांत गरज असते. असे क्षार मिश्रण बाजारात पावडर किंवा विटांचा स्वरुपात मिळते.

वासरांचा आहार

cow calf

जन्मलेल्या वासराला त्याचा आईचे चिकाचे दूधाच पाजणे खूप गरजेचे आसते. त्यामुळे वासरात रोगप्रतिकारशक्ती तयार होते. दुध एक महिन्यापर्यंत पाजावे. यानंतर दुध हळूहळू बंद करून  वासरांना लुसलुसीत हिरवा चारा द्यावा. 3 ते 4 आठवड्यानंतर वासरांना खुराक देण्यास सुरवात करावी.

पाणी व्यवस्थापन योग्य असावे पाण्याचे टब किंवा हौद वेळच्या वेळी स्वच्छ करावेत.

चारा व्यवस्थापनाबद्दल ही माहिती कशी वाटली हे आम्हाला प्रतिक्रियेद्वारे आवश्य कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *