जातिवंत दुधाळ गाईंची निवड कशी कराल

जातिवंत दुधाळ गाईंची निवड कशी कराल ?

जातिवंत दुधाळ गाईंची निवड कशी कराल

जातिवंत दुधाळ गाईंची निवड कशी कराल. जास्त दूध देणारी गाय. गाय बद्दल माहिती. संकरीत गाई. होस्टन गाय. दूध व्यवसाय माहिती.  

गाई पालन व्यवसायात सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जातिवंत गाईंची निवड होय. कारण सर्व व्यवस्था जरी चोप असली आणि गाई दुधाळ नसतील त्यांचे सडे बाद असतील, वजन कमी असेल, अशक्तपणा असेल, पाय खराब, चालताना अडखळत असेल. कासंमधले योग्य अंतर नसेल तर ती गाय दुध उत्पादनासाठी योग्य नाही. दुधाचे सर्वाधिक उत्पन्न गाईची पहिल्या पाच वेतामध्ये मिळते. म्हणून पहिल्या किंवा दुसऱ्या वेताची गाय खरेदी करावी.

शक्यतो बाजारातून गाय खरेदी करू नका कारण बाजारात गाई विकत घेताना फसण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणून गाई नामवंत गोठ्यातून तसेच ओळखीचा शेतकऱ्याकडून गाई खरेदी करा.

दुधाळ जनावरांची लक्षणे. जातिवंत दुधाळ गाईंची निवड कशी कराल ?

पाठीचा कणा सरळ असावा. त्याला बाक नसावा.

जनावर आकाराने मोठे असावे पण त्याला अनावश्यक चरबी नसावी.

जनावरांचे दात व्यवस्थित असावेत.

गाईंचा पार्श्वभाग मोठा असावा.

गुरांच्या नाकपुड्या रुंद आणि मोठ्या व ओलसर असाव्यात.

निवडलेल्या गाईची कास योग्य वाढलेली असावी. कास घट्ट असावी, लोंबलेली, ओघळणारी नसावी.

कासेची त्वचा मऊ असावी. कासेवर दुधाच्या शिरांचे जाळे असावे. दुधाची शीर जितकी मोठी नागमोडी, चांगली त्यावर त्या गाईचे दुध देण्याचे प्रमाण ठरते. कासेचे चारही कप्पे पूर्ण विकसित आणि समान असावेत. गाई विकत घेताना तीची धार काढून किती दुध निघते हे तपासावे.

गाईची प्रजनन पिशवी शक्य असल्यास डॉक्टरांकडून तपासून घ्यावी.

दुधासाठी कोणत्या जातींचा गाई निवडल?

जातिवंत दुधाळ गाईंची निवड कशी कराल ? खरतर दुधासाठी संकरीत गाईच योग्य आहेत. कारण संकरीत गाई योग्य संगोपन केल्यास  दिवसाला 25 लिटर पर्यंत दुध देऊ शकतात यात प्रामुख्याने होलस्टीन फ्रिजीयन आणि जर्सी आपल्या भागात पाळल्या जातात.

संकरीत दुधाळ गाई

  1. होलस्टीन फ्रिजीयन

ही गाय सर्वाधिक दुध देणारी गाय म्हणून प्रचलित आहे. या गाईचे मूळ स्थान हाँलंड आहे. या गाईची रंग काळा असून त्यावर पांढऱ्या रंगाचे मोठे ठिपके आढळतात. होलस्टीन फ्रिजीयन ही गाय एका वेतात सरासरी 7000 किलो दुध देते. ही गाय दररोज 25 लिटर दुध देऊ शकते.

2.जर्सी गाई

 

ही जात मुळची इंग्लडजवळील जर्सी बेटावरील आहे.या गाईची रंग तांबूस तपकिरी व गडद लाल असतो जर्सी गाय एका वेताला 5000 ते 8000 किलोपर्यंत दुध देते. या गाईची दुधात फँट्स प्रमाण जास्त 5 ते 5.5% इतके आहे. जर्सी गाईचे पहिल्या वेताचे वय 26 ते 30 महिन्यादरम्यान आढळते. भारतातील दमट हवामानात ही गाय चांगली मानवते.

3.फुले त्रिवेणी

महात्मा फुले कृषी विद्यापीठात फुले त्रिवेणी तिहेरी संकरीत गाय आहे. होलस्टीन फ्रिजीयन

जर्सी आणि गीर या गाईची संकरातून ही गाय तयार केलेली आहे. या गाईत  रोगप्रतिकारक्षमता जास्त आहे. भाकड काल कमी. एका वेतात 3000 ते 3500 दुध फुले त्रिवेणी गाय देते.

फुले त्रिवेणी प्रमाणेच कँरन फ्राई ही गाय थरपाकर आणि होलस्टीन फ्रिजीयन चे संकर आहे.

याचप्रमाणे रेड डँनिश, ब्राँऊन स्विस या देखील गाई दुधासाठी चांगल्या आहेत.

देशी दुधाळ गाई

  1. साहिवल

ही गाय मुख्यतः बिहार, पंजाब, दिल्ली, हरियाना या भागात आढळतात. या गाई मुळच्या पाकिस्तानातल्या माँटेगोमारी मधल्या आहेत. रंगाने लाल. ही गाय देशी गाईनमध्ये सर्वाधिक दुध देणारी गाय म्हणून ओळखली जाते. एका वेताला 2200 किलो पर्यंत दुध. दोन वेतांमधील अंतर 15 महिने आहे. पहिल्या वेताचे वय 32- 36 महिने एवढे आहे.

2.थारपारकर

मूळतः पाकिस्तान मधील असलेली ही गाय भारतात राजस्थान, गुजरात मध्ये आढळते. रंग पांढरा.वेताला सरासरी दुध 1500 किलो.

3. गीर, गिर गाय माहिती

गीर गाय

ही गाय मुख्यतः गुजरात मध्ये आढळते. महाराष्ट्रात सोरटी नावाने ओळखली जाते. ही गाय मुख्यता तांबड्या रंगाची, डोके पसरट, नाक छोटे, कान लांब आणि शिंगे अर्धचंद्राकार. गीर गाई एका वेताला 1800 किलो पर्यंत दुध देतात.

4. लाल कंधारी

महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील कंधार हे या गाईचे मूळ गाव. ही गाय दुध उत्पादनास आणि शेतीचा दोन्ही कामास उपयुक्त आहेत. ही गाय एका वेतास सरासरी 1700 किलो दुध देतात.

लाल सिंधी ही मुळची पाकिस्तानातल्या सिंध प्रांतामाधली आहे. भारतात पंजाब, हरियाना, ओरिसा, दक्षिण भारतात कर्नाटक, तामिळनाडू तसेच केरळ राज्यात आढळतात. रंग गडद लाल. ही गाय एका वेतास सरासरी 1700 किलो दुध देतात.

5.देवानी

ही गाय महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशात आढळतात. या गाईची दुधासाठी, शेतीचा कामासाठी उपयोग केला जातो.

6. डांगी

डांगी गाई

मूळ स्थान महाराष्ट्र व गुजरात सीमेवरील डांग जिल्हा या जातीचे बैल ताकदवान व गारीब असतात  म्हणून यांचा शेतीचा कामासाठी उपयोग केला जातो. काळ्या रंगावर पांढरे ठिपके असतात.

ओंगल, हरीयानी, कांकरेज या देशी गाई भारतात आढळतात देशी गाई मुख्यता बैल शेतीचा कामासाठी वापरल्या जातात.

जातिवंत दुधाळ होलस्टीन फ्रिजीयन, जर्सी, फुले त्रिवेणी, साहिवल, थारपारकर, गीर, लाल कंधारी, देवानी, डांगी गाईनविषयी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला प्रतीक्रीयेमधून नक्की कळवा. जातिवंत दुधाळ गाईंची निवड कशी कराल ही माहिती कशी वाटली हे प्रतिक्रियेद्वारे नक्की कळवा.

गाई पालनामाधी पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे चारा व्यवस्थापन कसे कराल? वाचण्यासाठी क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *