Cow palan Dudh utpadan Mahiti in Marathi Language

Cow palan Dudh utpadan Mahiti in Marathi Language

Cow palan Dudh utpadan Mahiti in Marathi Language

Cow palan Dudh utpadan Mahiti in Marathi Language. cow palan project information in Marathi. Dairy farming information in Marathi. Dairy farming in marathi language. गाय पालन कसे करावे.

नमस्कार मित्रांनो, आज आपण गाई पालन cow palan यासंधार्बत माहिती घेणार आहोत. गाय पालन हा शेतीचा जोडधंदा असला तरी तुमचा उदरनिर्वाहासाठी प्रमुख व्यवसाय उद्योग ठरू शकतो. जर तुम्हाला गाई पालन आवडत असेल या क्षेत्रामध्ये करियर करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला ही गाई पालन माहिती नक्कीच फायद्याची ठरू शकते.

मार्गदर्शन आणि व्यवस्थित नियोजन असेल तर गाय पालन धंद्यात तुम्ही शंभर टक्के यशस्वी होऊ शकता. नफा कमऊ शकता. पण तुम्हाला इतर व्यवसायाप्रमाणेच या ही धंद्यात कष्ट करावे लागेल. जर तुमचा मनात असेल की या उद्योगाला तुम्ही पार्ट टाईम धंदा म्हणून कराल आणि यशस्वी व्हाल तर तसं कधीच होणार नाही तुम्हाला वेळ द्यावा लागेल. कारण गाईना सर्व काही वेळेवर लागते. योग्य आहार लागतो. आजारी पडल्यार वेळेवर डॉक्टर, माज आल्यानंतर वेळेवर कृत्रिम रेतन करावे लागते.

उदाहरणार्थ 12 गाईंचा गोठा असेल तर आपण किती उत्पन्न मिळवू ? cow palan project information in Marathi.

जर आपल्या गोठ्यात 12 गाई आहेत. तर त्या सगळ्याच एकाच वेळेस वेणार नाहीत. आणि तसं असेल तर आपल्याला ते परवडणार नाही कारण सगळ्या गाई वेलेल्या असतील तर सगळ्या एकाच वेळेस आटणार. मग अशा गाईंचा सांगोपणासाठी खिशातून पुन्हा भांडवल गुंतवाव लागणार. गोठ्यात जर 12 गाई असतील तर त्यामधल्या वर्षभरात अंदाजे प्रत्येक महिन्याला एक गाई वेयला हवी. विकत घेतानाच या सर्व गोष्टींचा विचार करावा. किंवा गाभण गाई टप्या टप्याने विकत घ्याव्यात. म्हणजे 12 गाईंपैकी 2-3 गाई प्रत्येक महिन्यात 7-8 महिने गाभण आणि एक गाई वेयाला आलेली असाव्यात म्हणजे दूधाच चक्र थांबणार नाही. प्रत्येक महिन्यात 7-8 गाई दुध देणाऱ्या असाव्यात.

7-8 गाईचं सरासरी 10 लिटर प्रमाणे 80 लिटर दुध पकडू.

20 रुपये प्रती लिटर प्रमाणे 80 लिटरचे रोज 1600 रु. मिळतील. 48000 रू महिना.

यात पशुखाद्य खर्च 7 गाईना प्रत्येकी 2 किलो 22 रुपये प्रतिकिलो. 44 रु गुनुले 7=308 रू

2 लेबर व दवाखान्याचा व इतर रोजचा खर्च अंदाजे 550 रू

चारा स्वतःचा.

1600 -858  = 742 रु दिवसाला.

742 रु 30 दिवसाचे उत्पन्न 22260 रू तुम्ही महिना कमुऊ शकता.

यात शेणखताचे महिना 1000 आणि बारदाना 5 रु प्रती गोणी 8 गोण्याचे 40 रु

महिनाभराचे उत्पन्न 23300 रु आणि कालवडीचे वेगळे.

आज बाजारात गाईंची किंमत 60,000 रु आहे.

जातिवंत दुधाळ गाईंची निवड  pashupalan information in marathi project. Cow palan Dudh utpadan Mahiti in Marathi Language.

गाई पालन व्यवसायात सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जातिवंत गाईंची निवड होय. गाईनमध्ये प्रामुख्याने देशी गाई, विदेशी गाई आणि संकरीत गाई हे प्रकार पडतात.

देशी गाईनमध्ये साहिवाल, गीर, थारपकार, लाल सिंधी, लाल कंधारी, ओंगल, हरीयानी, कांकरेज, देवानी आणि डांगी ह्या प्रमुख जाती आहेत.

विदेशी गाईनमध्ये जर्सी, होलस्टिन फ्रिजियन, रेड डँनिश, ब्राऊन स्विस, कँरन फ्राई ई

फुले त्रिवेणी ही भारतात महात्मा फुले कृषी विद्यापीठात तयार केलेली संकरीत गाय आहे. गाईंचे संगोपन व्यवस्थितरित्या केल्यास दुधाची गाई 25 लिटर पर्यंत दुध देणार्याही संकरीत गाई आहेत.

देशी गाईंचा आणि जातिवंत दुधाळ गाईंची निवडीबद्दल अधिक वाचण्यासाठी क्लिक करा.

गाई पालन धंद्यातील दुसरी महत्वाचा मुद्दा म्हणजे गोठा व्यवस्थापन

गोठ्याची निवड गोठा व्यवस्थापन

गोठा व्यवस्थापन जितके योग्य असेल तितका गाईंचा आरोग्याला आणि उत्पादन क्षमतेला फायदा होतो.

यामध्ये प्रामुख्याने पारंपारिक गोठा पद्धत आणि आधुनिक गोठा वर्गीकरण होते.

पारंपारिक प्रकारात गाईची एकाच सुरक्षित छताखाली असतात. गव्हानीची सोय केलेली असते त्यातच चारा, खुराक (पशुखाद्य) आणि पाणी गरजेनुसार दिले जाते. या प्रकारात गाई सुरक्षित राहतात. पण गाई बांधलेल्या असतात त्यामुळे त्यांचा व्यायाम होत नाही त्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती कमी होते. पण या प्रकारात जनावरे अतिवृष्टी, जास्त थंडी यापासुन सुरक्षित राहतात.

मुक्त संचार गोठा व्यवस्थापन पद्धत. गाय पालन कसे करावे. Cow palan Dudh utpadan Mahiti in Marathi Language

हा प्रकार गोठा व्यवस्थापनाचा सगळ्यात योग्य प्रकार समाजाला जातो यामध्ये गाईंची रोगप्रतिकारशक्ती आणि दुध उत्पादन क्षमता वाढते. या पद्धतीत जनावरांसाठी जागा प्रत्येकी 60 स्क्वेअर फूट अशी असते आणि एका बाजूला छताची सोय असते यात गव्हाण आणि पाण्याची सोय असते.

मुक्त संचार गोठा व्यवस्थापन तसेच गोठा व्यवस्थापना बद्दल अधिक वाचण्यासाठी क्लिक करा.

तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे चारा व्यवस्थापन

जनावरांना प्रत्येकी दररोज 30 किलो चारा खायला लागतो. यात हिरवा चारा आणि वाळलेला  चार हे दोन प्रकार पडतात.

हिरव्या चारयामध्ये मका, ज्वारी, मेथी घास ई वाळल्या चार्यात कडबा, कडधान्याचे भुसकट, गहू सोयाबीनचे काड ई.

चारा कोणताही असला तरी गाईना तो कुट्टी करूनच खायला द्यावा.

तसेच मुरघास यात हिरवी मका गुळ व मीठ घालून ठराविक दिवस आंबवला जातो आणि आंबोन हे खाद्य देखील गाईंना प्रामुख्याने दिले जाते.

मुरघास तयार करण्याची पद्धत वाचण्यासाठी क्लिक करा.

चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे आजार व उपचार

गाईंना सर्वात महत्वाचे म्हणजे संसर्गजन्य रोगांसाठी लसीकरण. हागवण, गोचीड ताप, कँल्शियम तसेच अशक्तपणा, पोटफुगी या आजारांमुळे गाई दगावतात.  त्यांची सडे बाद होणे, दगडी कास या आजारांचे योग्य वेळेवर उपचार करावे लागतात.

गाईंचे आजार व उपचाराबद्दल अधिक वाचण्यासाठी क्लिक करा.

गाई पालन उद्योग धंद्यात यशस्वी उदाहरणे खूप सारे आहेत. चांगले मार्गदर्शन आणि नियोजन असेल तर तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता. Cow palan Dudh utpadan Mahiti in Marathi Language.

गाई पालनावर ही माहिती कशी वाटली हे आम्हाला प्रतिक्रियेद्वारे आवश्य कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *