Dugdh Vyavsay Mahiti Information Marathi

Dugdh Vyavsay Mahiti Information Marathi. दुग्धव्यवसाय कसा करावा. 

Dugdh Vyavsay Mahiti Information Marathi

Dugdh Vyavsay Mahiti Information Marathi

आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे. बहुतांश लोक शेती करतात. त्याचप्रमाणे आपला देश पशुसंपन्न आहे. पशुव्यवसायाला आपल्या अर्थव्यवस्थेत महत्वाचे स्थान आहे. पशुपालनावर आधारित असलेला हा उद्योग रोजगार निर्मितीक्षम उद्योग आहे. तुम्ही ह्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला असेल तर तो अतिशय योग्य आहे कारण दुध आणि दुधापासून बनलेले पदार्थ हे सगळेच आवडीने खातात. बाजारात दुधाची व दुग्धजन्य पदार्थांची मागणी कधीच कमी होणार नाही कारण हा धंदा शास्वत आहे. तुम्ही ठरवलं आहेच मग चला तर या दुग्ध व्यवसायाबद्दल माहिती घेऊयात. दूध व्यवसाय व पशुसंवर्धन.                                                            

गरज आहे चांगल्या मार्गदर्शनाची, मन लाऊन धंदा करण्याची आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मेहनत घेण्याची. जर तुम्हाला स्वतः वेळ देता येत नसेल तर या व्यवसायातल्या खाचा-खोचा तुम्ही शिकणार नाहीत पर्यायाने तुमची व्यवसायात प्रगती होणार नाही. कुठलीही नवीन व्यक्ती जेव्हा उद्योग धंद्यात उतरते तेव्हा ती व्यक्ती व्यवसाय चालवण्याबरोबरच व्यवसायातले अडथळे कसे दूर करावेत हेही  शिकत असते. खरतर स्वतःचा अनुभवच शिकवत असतो. या अडथळ्यांना घाबरून तुम्ही लगेच व्यवसाय बंद केला तर अशी व्यक्ती कुठलाच व्यवसाय करू शकत नाही. कारण कोणताच व्यवसाय असा नाही ज्यामध्ये उद्योजकला अडचणींना सामोरे जावे लागत नाही. म्हणून व्यवसायात चिकाटी आणि वेळेवर निर्णय घेण्याची क्षमता असणे गरजेचे आहे. ही कौशल्य जो उदोजक जेवढ्या लवकर अंगीकारीन तो व्यवसायात लवकर प्रगती करील.               

जगात सर्वात जास्त पशुधन हे भारतात आहे. 1400 दशलक्ष गुरांपैकी 280 दशलक्ष गुरे हे भारतात आहेत. भारतात गाईची 26 आणि म्हशीचा 6 जाती आढळतात.गाईंचा जातींबद्दल अधिक माहित वाचण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्रात देशाचा पशुधानापैकी 7.5 टक्के पशुधन आहे. दुध उत्पादनात म्हशींचा सर्वाधिक 52.8  टक्के वाटा आहे. आणि गाईंचा 43.7 टक्के वाटा आहे. आणि पशुधनाचा देशातील जीडीपीचा 4.07  टक्के इतका वाटा आहे.                        

दुग्धव्यवसायात रोजगाराची खूप मोठी संधी आहे. दुग्धव्यवसायाची व्याप्ती खूप मोठी आहे. Dugdh Vyavsay Mahiti Information Marathi.

1 गाई पालन ते गाई खरेदी विक्री, दुध तसेच शेणखत विक्री.

जातिवंत गाईची निवड, यामध्ये गाईने संगोपन करून बाजारात विक्री, गोठा व्यवस्थापन-गोठ्याचे प्रकार. चारा व्यवस्थापन चाऱ्याचे प्रकार हिरवा चारा, सुका चारा, द्वीदल, एकदल चारा, मुरघास निर्मिती, हायड्रोपोनिक, अझोला तसेच पशुखाद्य निर्मिती ई गोष्टी येतात. शेणखताची मागणी खूप आहे तुम्ही शेणखत विकू शकता. या सर्वामध्ये खुपमोठी रोजगार क्षमता आहे. तुम्ही या मधल्या कोणत्याही एका किंवा अनेक गोष्टीमध्ये खूप चांगला व्यवसाय करू शकता. गाई पालन बद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी क्लिक करा.           

2 दुध शितकरण केंद्र ते दुध पिशवी व दुग्धजन्य पदार्थ बनवणे

यामध्ये दही, लस्सी, ताक, खवा, पनीर, चक्का, श्रीखंड, चीझ, तूप, लोणी, आईस्क्रीम, सुगंधी दुध, छ्न्ना, दुध पावडर, कंडेन्स मिल्क ई पदार्थ तुम्ही बनवून विकू शकता. दुग्धजन्य पदार्थ कसे बनवावेत याबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी क्लिक करा.                     

3 दुग्धव्यवसायासाठी लागणारी उपकरणे, साहित्य

दुग्धव्यवसायात खूप सारी उपकरणे लागतात. यामध्ये धारा काढायची मशीन, ते दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठी उपकरणे. दुध तपासणीसाठी उपकरणे उदा फँट, डिग्री व दुध परीक्षणासाठी लागणारी उपकरणे. दुध साठवण्यासाठी लागणारी कँन व इतर भांडी. दुध प्रोसेसिंग साठी लागणारी उपकरणे उदा पाच्छरायझर, बॉयलर, चिलर, होमेरायजर, पँकिंग मशीन या मशीन तुम्ही बनवू किंवा विकू शकता. कारण जोपर्यंत दुग्ध व्यवसाय आहे तोपर्यंत दुग्ध व्यवसायासंधर्बात उपकरणे, यंत्रसामग्री लागणारच. तुम्ही यामध्ये उत्तमरित्या व्यवसाय करू शकता.                  

ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला प्रतिक्रियेद्वारे आवश्य कळवा. दुग्ध व्यवसाय मराठी माहिती. adarsh dugdh vyavsay. Dugdh Vyavsay Mahiti Information Marathi.

गाई पालन बद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी क्लिक करा. 

                                                          

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *